Monday, August 17, 2009

हुंकार वेदनेचे

माझ्या या स्वगताला कविता
म्हणायचे धाडस करु नका
हे फ़क्त हुन्कार आहेत !
एका अत्रुप्त आत्म्याचे
नाकारलेल्या जीवाचे
ज्याला शरीरच मिळाले नही..........
हे आक्रन्दन आहे
तडफ़डणारया मनाचे,
ज्याचे सन्चित सम्पले आहे!
याला कवितेचा दोष देऊ नका!
हा शाप मी शब्दानी भोगतोय!
अश्वतथाम्याचे प्राक्तन घेऊन
स्वत:ला शोधतोय?
वसन्तात फ़ुले फ़ुलतील
आषाढात मेघ बरसतील
हि नियती आहे!
माझे शब्द अवेळी येणारया
पक्श्याप्रमाणे आहेत, जो थवा सोडुन भरकटलाय!
मी एवढेच सान्गिन
जे दु:ख मी भोगतोय!
त्या वेदना इथे उमटतायेत!
ह्या आहेत, अपुर्णतेच्या, वान्झपणाच्या खुणा,
ह्याला लेणी म्हणु नका! फ़क्त दगड!
उन,वारा, पाऊस झेलणारा!
एवढेच फ़क्त!

विजयकुमार.........