भासमय !
आहे कोणी
मनात लपलेले
तरी सारे
भासमय !
जाता समोरुनी
हृदयात कळ
कवितेची ओळ
सुचुनी जाते !
ओला पुष्पगंध
मनास मोहविणारा
शहारे येती
अस्तित्वाचे !
न बोलताच
निशब्द भाषा
मौनात उत्तरे
रेंगाळती !
हलक्याच स्मितासाठी
चोरटे कटाक्ष
नजरेत आतुरता
विसावते !
दूर असुनी
सहवासाचे ओढ
वेड्या मनात
कालवाकालव !
अप्राप्य असे
तरी हवेहवेसे
समीप येता
दुरावते !
विजयकुमार.........
१२.१०.२००९,मुंबई
Tuesday, October 27, 2009
Friday, October 9, 2009
आठवणीतल्या आठवणी
कामतीच्या रस्त्यावरची
धूळ उडवत तू शहराकडे
निघालीस
चवथ्या बाळान्तपणासाठी,
मी टाहो फोडला
तुझ्याशिवाय
असा एकटा कधी राहिलो
नव्हतो गं !
तुही भरल्या डोळ्यांनी
मागे मागे पहात
जड झालेली पावले
धुळीत
रुतावत चालू लागलीस ....
ढेकळांच्या काळ्या
रानात मी उष्ण आश्रू
गाळत होतो
अन् तू
धुळवाट ओली करत
अस्पष्ठ होत
राहीलीस....
तेव्हापासून तुला
जडलेला अस्पष्ठतेचा
शाप
तू कधीच सोडला
नाहीस....
बाप तुझ्या तोंडावर
दहाच्या तीन नोटा
फेकून देशांतारास
गेला
तू मात्र चार पिल्ले
कुशीत घेवून
सारवलेल्या जमिनीचे
पोपडे निरखू लागलीस !
कधी म्हणाली होतीस
बापाने रुखवतात
कुंकवाचा करंडा दिला
नाही !
म्हणून चिमटीतले
कुंकू हवेत पसरते
कधीतरी मग कुंकवाआडचे
मेण दिसते
हिरवट....
आज त्याचा अर्थ लागतो आहे .......
विजयकुमार.............
१६.०९.२००९ ,मुंबई
कामतीच्या रस्त्यावरची
धूळ उडवत तू शहराकडे
निघालीस
चवथ्या बाळान्तपणासाठी,
मी टाहो फोडला
तुझ्याशिवाय
असा एकटा कधी राहिलो
नव्हतो गं !
तुही भरल्या डोळ्यांनी
मागे मागे पहात
जड झालेली पावले
धुळीत
रुतावत चालू लागलीस ....
ढेकळांच्या काळ्या
रानात मी उष्ण आश्रू
गाळत होतो
अन् तू
धुळवाट ओली करत
अस्पष्ठ होत
राहीलीस....
तेव्हापासून तुला
जडलेला अस्पष्ठतेचा
शाप
तू कधीच सोडला
नाहीस....
बाप तुझ्या तोंडावर
दहाच्या तीन नोटा
फेकून देशांतारास
गेला
तू मात्र चार पिल्ले
कुशीत घेवून
सारवलेल्या जमिनीचे
पोपडे निरखू लागलीस !
कधी म्हणाली होतीस
बापाने रुखवतात
कुंकवाचा करंडा दिला
नाही !
म्हणून चिमटीतले
कुंकू हवेत पसरते
कधीतरी मग कुंकवाआडचे
मेण दिसते
हिरवट....
आज त्याचा अर्थ लागतो आहे .......
विजयकुमार.............
१६.०९.२००९ ,मुंबई
Subscribe to:
Posts (Atom)