Wednesday, September 2, 2009

उपरती होवू नये म्हणुन चुका करू नये आणि चुक घडल्यास पश्चाताप व्हावा, उपरती होवू नये.
उपरती

कुजवुनी मोगरे सारे
सुगंध मनात मारले
मरणवाटेवरचे आयुष्य
शराबी बेहोशीत राहीले

पर्वतावरुनी झोकुनी देह
रक्ताचे प्रपात वाहीले
आभाळाचे करुनी डोळे
कलेवर माझे पाहीले

सुकवुनी आसवे डोळ्यात
स्वप्नांना अंधारात लोटले
निभावुनी धर्म आयुष्यात
अंती शरीर बाटले

दफ़न करा अथवा जाळा
अर्थ उरला ना मरणात
फुका अफूच्या गोळीसमवेत
स्वारस्य असे ना जगण्यात

राहू दे एकटेच आता
मळकट वाटेवरी पावलांना
रोज मरणे असे हे
ना डरे मरणाच्या सरावांना

जगण्यातली जाणवली उपरती
आता पश्चाताप फोल
घडणारे घडुनी गेले
आयुष्याचे सरले मोल

विजयकुमार.........
२०.०८.२००९, मुंबई

No comments:

Post a Comment